ग्रुप ग्रामपंचायत सुपोंडे

सुपोंडे हे गाव वाडा तालुक्यात, पालघर जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यात वसलेले आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार या गावाची एकूण लोकसंख्या १९३४असून त्यापैकी ९८६ पुरुष व ९८६महिला आहेत. गावात एकूण ५०८ कुटुंबे वास्तव्यास आहेत. ० ते ६ वयोगटातील एकूण ११८ लहान मुले असून त्यात ५९ मुले व ५९ मुली आहेत, म्हणजेच या वयोगटात मुलं आणि मुलींचे प्रमाण समान आहे. गावाचा साक्षरता दर ७४.४% असून त्यात पुरुष साक्षरता ८२.०३% तर महिला साक्षरता ६६.५१% आहे.
गावातील लोक मुख्यतः शेतीवर अवलंबून असून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. स्वतःची जमीन असलेले शेतकरी, शेतीमजूर तसेच इमारत बांधकाम, लघुउद्योग आणि घरगुती कामे करणारे कामगारही येथे आहेत. या गावात पारंपरिक सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव हा गावातील प्रमुख उत्सव असून घराघरांत गणपतीची स्थापना केली जाते व सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आरती, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. नवरात्रोत्सवात देवीची आराधना केली जाते तसेच गरबा आणि भजन कार्यक्रम घेतले जातात. होळी आणि धुळवड सण आनंदाने साजरे केले जातात, तर दिवाळीत घरांची सजावट करून लक्ष्मीपूजन केले जाते. मकरसंक्रांती, गुढीपाडवा आणि श्रावणातील विविध धार्मिक कार्यक्रमही पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. आदिवासी समाजामध्ये पारंपरिक नृत्यप्रकार, जसे की तारपा नृत्य, सणासुदीला सादर केले जातात. या सर्व सण-उत्सवांमुळे गावात सामाजिक ऐक्य, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो.हे.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
१९३४
पुरुष लोकसंख्या
९८६
महिला लोकसंख्या
९४८
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
118 
अनुसूचित जाती (SC %)
21
अनुसूचित जमाती (ST %)
468

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक सुविधा प्रकार उपलब्ध (होय/नाही) संख्या रस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालय होय होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)  नाही  –   
उपकेंद्र (Sub Center)  नाही   –  
अंगणवाडी होय   ४  होय  
प्राथमिक शाळा  होय   5  होय   
माध्यमिक शाळा  नाही   
उच्च माध्यमिक शाळा   नाही  –   
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र   नाही  –   
समुदाय भवन (Community Hall) होय  १   होय  
१० स्वस्त दर दुकान (PDS)  होय   १  होय   
११ श्मशानभूमी / स्मशानभूमी  होय   २  होय   
१२ इंटरनेट / मोबाईल टॉवर  नाही  –   
१३ सीएससी केंद्र (CSC Center) होय    १  होय   

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव :  ग्रामपंचायत सुपोंडे 

बँकेचे नाव : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. 

शाखेचे नाव : वाडा 

अकाउंट नंबर : 006300300000644

आई एफ एस सी कोड : TDCB0000063

पत्ता : ग्रुप ग्रामपंचायत सुपोंडे – कुमदळ – रायसल 
ता. – वाडा , जि. – पालघर ( ४२१३०३ )